‘नास्तिक-विचार’ हा ‘आस्तिक-विचारां’च्या तुलनेत अधिक तर्कशुद्ध, प्रगत, उत्क्रांत टप्पा आहे, हे ठामपणे सांगणं गरजेचं आहे…(उत्तरार्ध)
आस्तिक आणि नास्तिक यांच्यात काही मूलभूत मतभेद असले, तरी आस्तिक हे नास्तिकांचे (किंवा उलटही) शत्रू आहेत, असं मला कधी वाटलेलं नाही, आजही नाही. गेल्या काही वर्षांत आस्तिकतेचे जे आक्रमक आविष्कार आपल्याला दिसत आहेत, त्यामागे अनेक राजकीय, धार्मिक कारणं आहेत. नास्तिक विचार स्वीकारणाऱ्यांची संख्या वाढली, तर देवाधर्मावरून लोकांना भडकावणं राजकीय पक्षांसाठी सध्या आहे, तेवढं सोपं राहणार नाही.......